श्रीराम राम हे म्हणा | Shreeram Ram He Mhana
- Get link
- X
- Other Apps
श्रीराम राम हे म्हणा
सुरेन्द्र चंद्रशेखरु - अखंड ध्यातसे हरु। जनासी सांगते खुणा - श्रीराम राम हे म्हणा।।
महेश पार्वती प्रती - विशेष गुज सांगती। सलाभ होतसे दुणा - श्रीराम राम हे म्हणा।।
विषे बहुत जाळिले -विशेष अंग पोळिले। प्रचित माझिया मना - श्रीराम राम हे म्हणा।।
विशाल व्याळ व्यस्तकी - नदी खळाळ मस्तकी। ऋषि भविष्य कारणा - श्रीराम राम हे म्हणा।।
अपाय होत चुकला - उपाय हा भला भला। नसे जयासी तुळणा - श्रीराम राम हे म्हणा।।
बहुत प्रयत्न पाहिले - परंतु सर्व राहिले। विबुध पक्ष रक्षणा - श्रीराम राम हे म्हणा।।
विरामध्ये विरोत्तमु - विशेष हा रघोत्तम।। सकाम काळ आंकणा - श्रीराम राम हे म्हणा।।
बहुत पाहिले खरे - परंतु दोन्ही अक्षरे। चुकेल येम यातना - श्रीराम राम हे म्हणा।।
मनी धरुनी साक्षपे - अखंड नाम हं जपे। मनांतरी क्षणक्षणा - श्रीराम राम हे म्हणा।।
देहे धरुनी वानरी - अखंड दास्य मी करी। विमुक्त राज्य रावणा - श्रीराम राम हे म्हणा।।
।। जय जय रघुविर समर्थ ।।
समर्थ रामदास स्वामी
समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एक प्रभावशाली संत, विचारवंत आणि समाजसुधारक होते...
त्यांनी श्रीराम व हनुमान यांच्या भक्तीत जीवन वाहिले आणि समाजात नीती, संयम, आणि शक्तीचा संदेश दिला...
त्यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘दासबोध’ हे आत्मबल आणि जीवनदर्शन देणारे ग्रंथ आजही प्रेरणादायी आहेत.
- Get link
- X
- Other Apps