बुद्धी दे रघुनायका – जीवनाच्या संघर्षात भगवंताची करुणा मागणारी हृदयस्पर्शी प्रार्थना | Buddhi De Raghunayaka

बुद्धी दे रघुनायका | समर्थ रामदास स्वामी

बुद्धी दे रघुनायका

युक्ती नाही बुद्धी नाही
विद्या नाही विवंचिता
नेणता भक्त मी तुझा
बुद्धी दे रघुनायका ||

मन हे आवरे नाकी 
वासना वावरे सदा
कल्पना धावते सैरा
बुद्धी दे रघुनायका ||

अन्न नाही वस्त्र नाही
सौख्य नाही जनामध्ये
आश्रयो पाहता नाही
बुद्धी दे रघुनायका ||

बोलता चालता येना
कार्यभार कळेची ना
बहुत पिडलो लोकी
बुद्धी दे रघुनायका ||

तुझा मी टोणपा झालो
कष्ट लो बहुता परी
सौख्य ते पाहता नाही
बुद्धी दे रघुनायका ||

नेटके लिहिता येना
वाचिता चुकतो सदा
अर्थ तो सांगता येना
बुद्धी दे रघुनायका ||

प्रसंग वेळ तर्केना
सुचेना दीर्घ सूचना
मैत्रिकी राखिता येना
बुद्धी दे रघुनायका ||

संसारी श्लाघ्यता नाही 
सर्वही लोक हासती
विसरू पडतो पोटी
बुद्धी दे रघुनायका ||

चित्त दुश्चित्त होत आहे
ताळतंत्र कळेची ना
आळसो लागला पाठी
बुद्धी दे रघुनायका ||

कळेना स्फूर्ती होईना
आपदा लागली बहु
प्रत्ययही पोट सोडीना
बुद्धी दे रघुनायका ||

संसार नेटका नाही 
उद्वेग वाटतो जीवी
परमार्थ याकळे नाखी
बुद्धी दे रघुनायका ||

देईना पुरविना कोणी
उगेची जनहासती
लौकिक राखता येईना
बुद्धी दे रघुनायका ||

पिशुने वाटती सर्वे
कोणीही मजला नसे
समर्था तू दया सिंधू
बुद्धी दे रघुनायका ||

उदास वाटते जीवी
आता जावे कुणीकडे
तू भक्त वत्सला रामा
बुद्धी दे रघुनायका ||

काया वाचा मनोभावे 
तुझा मी म्हणवीतसे
हे लाज तुजला माझी 
बुद्धी दे रघुनायका ||

सोडविल्या देवकोटी
भूभार फेडीला बळे
भक्तासी आश्रयो मोठा
बुद्धी दे रघुनायका ||

भक्त उदंड तुम्हाला
आम्हाला कोण पुसते
ब्रीद हे राखणे आधी
बुद्धी दे रघुनायका ||

आशा हे लागली मोठी
दयाळू वा दया करी
आणखी न लगे काही
बुद्धी दे रघुनायका ||

उदंड ऐकिली कीर्ती
पतित पावना प्रभू
मी एक रंक निर्बुद्धी
बुद्धी दे रघुनायका ||

रामदास म्हणे माझा
संसार तुज लागला
संशयो वाटतो पोटी
बुद्धी दे रघुनायका ||

बुद्धी दे रघुनायका ||

बुद्धी दे रघुनायका ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||
      
Samarth Ramdas Swami

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एक प्रभावशाली संत, विचारवंत आणि समाजसुधारक होते...

त्यांनी श्रीराम व हनुमान यांच्या भक्तीत जीवन वाहिले आणि समाजात नीती, संयम, आणि शक्तीचा संदेश दिला...

त्यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘दासबोध’ हे आत्मबल आणि जीवनदर्शन देणारे ग्रंथ आजही प्रेरणादायी आहेत.

© 2025 || जय जय रघुवीर समर्थ ||

Popular posts from this blog

Teachers-"Brightness in life". First Poem by Varun Joshi

Is Happiness a Choice? Uncovering the Power Within