Sunday, 7 December 2025

Komal wacha de re ram | सज्जनगड दैनंदिन उपासना - कोमळ वाचा दे रे राम

बुद्धी दे रघुनायका | समर्थ रामदास स्वामी

कोमळ वाचा दे रे राम

कोमळ वाचा दे रे राम। विमळ करणी दे रे राम।।धृ।।  
प्रसंग ओळखी दे रे राम। धुर्तकळा मज दे रे राम।।१।।
हितकारक दे रे राम। जनसुखकारक दे रे राम।।२।।
अंतरपारखी दे रे राम। बहुजनमैत्री दे रे राम।।३।।
विद्यावैभव दे रे राम। उदासीनता दे रे राम।।४।।
मागो नेणे दे रे राम। मज न कळे ते दे रे राम।।५।।
तुझी आवडी दे रे राम। दास म्हणे मज दे रे राम।।६।।




संगीत गायन दे रे राम । अलाप गोडी दे रे राम।।धृ।।
धातामाता दे रे राम। अनेक धाटी दे रे राम।।१।।
रसाळ मुद्रा दे रे राम।  जाड कथा मज दे रे राम।।२।।
दस्तक टाळी दे रे राम। नृत्यकला मज दे रे राम।।३।।
प्रबंध सरळी दे रे राम। शब्द मनोहर दे रे राम।।४।।
सावधपण मज दे रे राम।बहुत पाठांतर दे रे राम।।५।।
दास म्हणे रे सदगुण धाम। उत्तम गुण मज दे रे राम।।६।।




पावन भिक्षा दे रे राम। दीनदयाळा दे रे राम।।धृ।।
अभेद भक्ती दे रे राम। आत्मनिवेदन दे रे राम।।१।।
तद्रुपता मज दे रे राम। अर्थारोहण दे रे राम।।२।।
सज्जनसंगती दे रे राम। अलिप्तपण मज दे रे राम।।३।।
ब्रम्हअनुभव दे रे राम। अनन्यसेवा  दे रे राम।।४।।
मजविण तू मज दे रे राम। दास म्हणे मज दे रे राम।।५।।
  
।। जय जय रघुविर समर्थ ।।
      
Samarth Ramdas Swami

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील एक प्रभावशाली संत, विचारवंत आणि समाजसुधारक होते...

त्यांनी श्रीराम व हनुमान यांच्या भक्तीत जीवन वाहिले आणि समाजात नीती, संयम, आणि शक्तीचा संदेश दिला...

त्यांचे ‘मनाचे श्लोक’ आणि ‘दासबोध’ हे आत्मबल आणि जीवनदर्शन देणारे ग्रंथ आजही प्रेरणादायी आहेत.

© 2025 || जय जय रघुवीर समर्थ ||

CS First Year Guide

The Top 1% CS Freshman: Language & Strategy Guide CS ...